Breaking News

’हिंदवी’तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती


सोलापूर - हिंदवी परिवाराच्या वतीने देशव्यापी गडकोट मोहिमांचे आयोजन सातत्याने केले जाते. यंदाच्या वर्षी सालाबादप्रमाणे हिंदवी परिवाराच्या वतीने देशव्यापी पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवाराचे प्रमुख डॉ. शिवरत्न शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी (दि.15) जून ते रविवार (दि. 15) जुलै दरम्यान या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू, पानिपतकार विश्‍वास पाटील, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, माजी आ. बाळासाहेब मुनगीनवार, बाळूभाऊ धानोरकर, भाऊसाहेब दांगडे अतिरिक्त जिल्हाधिकारी मुंबई, चंद्रकांत गुडेवार पुणे हे मान्यवर या मोहिमेत सहभागी होणार आहेत. मोहिमेत वय वर्षे दहा ते 55 वर्षांपर्यंत बालक, महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी 30 जूनपर्यंत आपली नावे नोंदवावीत. मोहिमेसाठी फक्त पाचशे शिवभक्तांना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक मा हितीसाठी अमोल मोहिते - 94220 67341 यांच्याशी संपर्क साधावा. विशेष म्हणजे शिवभक्तांना गडकोट मोहिमांची माहिती होण्यासाठी हिंदवी परिवाराने ुुु.हळपवर्रींळरिीर्ळींररी.ेीस या संके तस्थळाची निर्मिती केली आहे. शिवभक्तांनी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरण्याची सोय केलेली असून त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी आयोजकांनी केले.