एअर होस्टेस, हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणाची होणार सुरुवात
सोलापूर - जेट एज एअर होस्टेस अकॅडमी व न्यू एज कॉम्प्युटर यांच्या वतीने सोलापुरात एअर होस्टेस व हॉटेल मॅनेजमेंट या विषयावर प्रशिक्षण कोर्स सुरू करणार असल्याची मा हिती रमेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.17) डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सकाळी 11 वाजता मोफत करिअर सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंटरनॅशनल एअर होस्टेस अमिशी हे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मोहिते यांनी केले. या करिअर सेमिनारसाठी नावनोंदणी आवश्यक असून न्यू एज कॉम्प्युटर, लष्कर येथे नावनोंदणी करून फ्री पासेस घेता येणार आहे.
