Breaking News

चिमणी उभारण्यासाठी 3 ठिकाणी पर्यायी जागा


सोलापूर - पाच दिवसांनंतर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सादर केलेला अहवाल जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना मिळाला. अहवालामध्ये विमानसेवेत अडथळा ठरत असलेल्या चिमणीसाठी सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या परिसरात तीन ठिकाणी पर्यायी जागा दिली आहे. त्या ठिकाणी चिमणी उभा करायची की नाही ? हा कारखाना व्यवस्थापनाचा निर्णय आहे. हा पर्याय मान्य नसेल तर त्यांनी प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे हवाई अंतर मोजण्यासाठी शासकीय शुल्क भरून मोजणी करण्याचा पर्याय राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. पण चिमणीचा अडथळा दूर होऊन विमानसेवा सुरू होणार का ? हा प्रश्‍न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे विमानतळ प्राधिकरणाचा चिमणी पाहणीचा अहवाल प्राप्त झाला. अहवालामध्ये कारखाना परिसरातील तीन ठिकाणी पर्यायी चिमणी उभारण्यासाठी योग्य जागा असल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. हा पर्याय कारखाना प्रशासनाला मान्य नसल्यास त्यांनी हवाई अंतर मोजणीसाठी (रशीेपर्रीींळलरश्र र्ीीींवू) विमानतळाच्या मुख्यालयाकडे रीतसर शुल्क भरावेत, त्यांनी मोजणी करून घ्यावी, हाही पर्याय अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.