Breaking News

पंढरपूर आषाढी पायी दिंडीची जय्यत तयारी; ६ जुलै रोजी होणार प्रस्थान


नेवासा प्रतिनिधी 
असलेल्या श्रीक्षेत्र देवगड देवस्थांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरला दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानचे हभप भास्करगिरी महाराज यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली आषाढी पायी दिंडीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी नेवासे नगरीत राज्यातील पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे. 

या दिंडीत सुमारे बाराशे महिला व पुरुष सहभागी होणार आहेत. या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्याचा संपूर्ण पोशाख हा पांढरा असून धोतर, सदरा, टोपी, गळ्यात तुळशीमाळ असणाऱ्यांच दिंडीत प्रवेश दिला जातो. प्रत्येकावर लक्ष ठेवले जाते, असे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. या दिंडीच्या स्वागतासाठी गावगावचे भाविक सज्ज झाले आहे.