पालकमंत्र्यांना तालुक्यात फिरु देणार नाही : अॅड. शिंदे
आंदोलनात अॅड. सुरेश शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते.कुकडीच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी या भागाला कायम आंदोलन करावे लागते. पोटचार्यांची कामे अपुर्ण असल्याचे माहिती असुनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. शेतकर्यांचे पाणी न मिळाल्याने नुकसान होते. सत्तेत नसताना राम शिंदे यांनी या प्रश्नाविषयी रस्त्यावर उतरून पाणी मिळण्याची मागणी केली होती.
याची माहिती असताना आता का पाणी देत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांना पालकमंत्री या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत जोरदार निषेध नोंदवला. पुल न झाल्यास व कुकडीचे पाणी न मिळाल्यास पालकमंत्र्यांना तालुक्यात फिरु देणार नाही असे ते म्हणाले.
