पंडीत दीनदयाळ योजनेअंतर्गत पाचवी तुकडी रवाना
कोेपरगांव शहर प्रतिनीधी
पंडीत दीनदयाळ ग्रामीण कौशल्य विकासयोजनेअंतर्गत पुणे येथे तीन महिने व्यावसायिक प्रशिक्षणासाठी कोपरगांवातून २० मुलींच्या पाचवी तुकडी नुकतीच रवाना झाली. संजीवनी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते यावेळी झेंडा दाखविण्यात आला. येथे ७० मुले प्रशिक्षण घेत आहेत. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, दिलीप दारूणकर, एल. डी. पानगव्हाणे, अशोक आघाव, नोहा पावले, श्वेतांबरी राऊत, अनिता मुरकुटे, मंगल वाघे आदी उपस्थित होते. विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने पंडीत दीनदयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत तीन महिने हाॅटेल व रिटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम शिकवून त्याबाबतचे ज्ञान दिले जाते. निवासासह सर्व व्यवस्था शासनांमार्फत केली जाते. सुशिक्षित बेरोजगारांना यातून व्यावसायिक प्रशिक्षण मिळून रोजगाराची प्राप्ती होते. तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क कोपरगांवला मंजूर झाला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आ. स्नेहलता कोल्हे यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी आणून कामांचा धडाका लावला आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना काॅल सेंटरच्या माध्यमातून सर्वप्रथम रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हे कामही चांगल्या प्रकारे सुरू आहे. शेवटी सतिश लोहकणे यांनी आभार मानले.