Breaking News

काँग्रेस सेवादलाच्या सचिवपदी सुरेश झावरे


संगमनेर प्रतिनिधी

अहमदनगर काँग्रेस सेवादलाच्या सचिवपदी सुरेश झावरे यांची निवड झाली, अशी माहिती सेवा दलाचे अध्यक्ष केशवराव मुर्तडक यांनी दिली. झावरे यांच्या निवडीबद्दल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे ‘सुदर्शन’ निवास्थानी आ. थोरात यांचे हस्ते सत्कार त्यांचा करण्यात आला.

टीडीएफचे राज्याचे सचिव हिरालाल पगडाल यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. थोरात यांच्या हस्ते झावरे यांना सदर निवडीचे पत्र देण्यात आले. झावरे यांच्या या निवडीचे महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, टीडीएफचे राज्याचे सचिव हिरालाल पगडाल, जिल्हा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सिताराम वर्पे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत सातपुते, सचिव सचिन फटांगरे, विकास वनपत्रे, अरविंद कडलग, जिजाबा हासे, नंदू भडांगे, शशिकांत कंकरेज, शांताराम डोंगरे, दिलीप लांडगे, प्रल्हाद आरोटे , सचिन वर्पे आदींसह कनोली पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले.