Breaking News

नौका बॅक टू किनारा !

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, जून - 1 जूनपासून शासनाचा मच्छिमारी बंदीचा कालावधी सुरू होत झाला तरी मान्सूनपूर्व हालचाली लक्षात घेता देवगडमधील मच्छिमारांनी आपल्या होड्या त्यापूर्वीच कि नार्‍यांच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. तर काहींनी खाडी भागात आपल्या होड्या नांगरून ठेवल्या आहेत. मच्छिमारीसाठी समुद्रात असणार्‍या होड्या आता मात्र पावसापूर्वी बॅक टू कि नारा आल्या असल्याचे चित्र देवगडसह जिल्ह्यातल्या सर्वच समुद्रकिनारी दिसून येत आहे.

सुमारे दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहणार असून पावसात दैनंदिन रोजगारासाठी खाडीतील मासेमारी सुरू राहील. जून, जुलै या महिन्यात मत्स्यबीज निर्मिती होत असते. तसेच पाऊस आ णि वादळी हवामानामुळे जीवितहानी होण्याचा धोका असल्याने शासनाकडून या कालावधीत मासेमारी बंदी असते.
दरम्यान महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ या पश्‍चिम किनार्‍यावर एकाच वेळी 61 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी लागू झाली आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार 1 जून पासून 31 जुलैपर्यंत ही बंदी असणार आहे. 1 ऑगस्टला मासेमारीला सुरुवात होईल पण तोपर्यंत मत्स्यखवय्यांना आधार असेल तो खाडीपात्रातल्या माशांचा.