Breaking News

डाक कर्मचार्‍यांचा 12 व्या दिवशीही संप सुरूच

खामगाव, दि. 03, जून - ग्रामीण डाक सेवक संघटनांनी 22 मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप 12 व्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने सुरू असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला आहे. देशातील 70 टक्के जनता ही ग्रामीण भागात असून देशातील डाक विभागाचे जाळे हे शाखा डाकघरांच्या माध्यमातून जुडले आहेत. देशातील सुमारे 1.35 लाख शाखा डाकघरे व 2.70 लाख ग्रामीण डाकसेवक सद्यास्थितीत बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु केंद्र सरकार जाणीवपूर्वक ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या रास्त मागण्या शक्य तेवढ्या लवकर निकाली न निघाल्यास ग्रामीण डाकसेवक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. 2 जून रोजी मुख्य पोस्ट ऑफीस समोर ग्रामीण डाकसेवकांच्या वतीने धरणे आंदोलन क रण्यात आले व घोषणा देण्यात आल्या.