वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
शिर्डी / प्रतिनिधी
शहरातील श्रीरामनगर या भागात राहणारे नारायण एकनाथ आहेर {वय-६५} या वृद्ध इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी {दि. १२ } ही घटना उघडकिस आली. हा प्रकार घरच्या लोकांच्या लक्षात आला.
आहेर यांच्या नातेवाइकांनी उपचारासाठी त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची खबर
साईबाबा हॉस्पिटलने शिर्डी पोलिसांना दिली. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.