Breaking News

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

कोपरगाव शहर प्रतिनिधी :

शहरातील विघ्नेश्वर चौकाजवळ विनापरवाना बेकायदा मटका आकड्याचा खेळ खेळला जात असताना कोपरगाव शहर पोलीस पथकाने तेथे अचानक छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळत असलेल्या आणि खेळवित असलेल्या लोकांना अटक करण्यात आली. या कारवाईत जुगाराचे साहित्य व ९१० रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या कारवाईत पोलिसांनी सुनील सुभाष शिंदे (महादेव बगीचा जवळ, कोपरगाव ), विकास प्रभात कोतकर (मनाई वस्ती, शिंगणापूर ) तर सचिन मंजाहारी शिंदे (टिळकनगर , कोपरगाव ) या तिघांना अटक केली. या तिघांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.