मनोरा आमदार निवासप्रमाणे मंत्रालय डेब्रीज घोटाळा विधीमंडळात झाला तारांकित
रणजीत हांडेंवर सभागृहात कारवाई करण्याची मागणी शक्य
मुंबई/ विशेष प्रतिनिधी ।21 :
मनोरा आमदार निवास घोटाळा प्रकरणी गेल्या तीन अधिवेशनात झालेला गोंधळ अद्याप ताजा असतांना मंत्रालय डेब्रीज प्रकरणही पावसाळी अधिवेशनात सरकारच्या पारदर्शकतेचे वाभाडे काढणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान मंत्रालय डेब्रीज प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून मनोरा प्रकरणाप्रमाणेच सरकार या प्रकरणातही निलंबनाची कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रणजीत हांडे यांच्याकडे शहर इलाखा साबां विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार असतांना डेब्रीज घोटाळा झाल्याचा आरोप असून त्याची चौकशी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार करीत आहेत. या पार्श्वभुमीवर पुढील महिन्यात पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर विधीमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अमरसिंह पंडीत, सतिश चव्हाण, किरण पावसकर या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
तारांकीत प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी सरकारपक्षातर्फे साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर असून मनोरा आमदार निवासप्रमाणे या प्रकरणातही संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली जाणार आहे. या अनुषंगाने तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे याची वाटचाल प्रज्ञा वाळके यांच्या मार्गावर सुरू असल्याचे बोलले जात आहे.
(क्रमशः)
उद्याच्या अंकात
काय आहे रणजीत हांडेंवर ठपका?
चौकशी अहवालाची स्थिती काय आहे?
तारांकीत प्रश्नांवर साबां प्रशासनाचे संभाव्य उत्तर
काय असेल?
यासह संपूर्ण प्रकरणाची खानेसुमारी