Breaking News

संजीवनी सैनिकी स्कूलचा निकाल १०० टक्के


कोपरगांव शहर प्रतिनिधी : 
दहावीच्या परीक्षेत संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. स्कूलने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती स्कूलचे कमांडंट अशोक थोरात यांनी दिली. 

सुदर्शन दराडे याने ९२. २० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. आशिष फलटनकर हा ९२ टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये दुसरा तर नितीन धवन याने ९१. ८० टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

या संस्थेत विविध स्तरावरील स्पर्धा परीक्षांचीही तयारी प्राचार्य विश्वनाथ शेळके व त्यांचे सहकारी शिक्षक यांचेकडून करून घेतली जाते, असे कमांडंट थोरात यांनी संगितले.