Breaking News

भूषण बोरनारे फिलिपीन्स-मलेशियाला रवाना


कोेपरगांव शहर प्रतिनीधी. 
तालुक्यातील संवत्सर येथील भूषण बोरनारे हे नुकतेच फिलिपीन्स व मलेशिया येथे रवाना झाले आहेत. सिंगापूरच्या अॅनचॅन्टो या संगणक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीने प्रोजेक्टसाठी त्यांची निवड केली आहे. भूषण हे संजीवनी कारखान्याचे संचालक फकिरराव बोरनारे यांचे सुपुत्र आहेत. पुणे येथे असिस्टंट मॅनेजर या पदावर ते काम करीत आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे, कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी बोरनारे यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.