फुले पगडी मागे शरद पवारांंचे राजकारण दडलय - खा. संजय राऊत
पुणे - शरद पवारांनी ही पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान आहे. कारण ही पगडी पुण्याची प्रतिष्ठा आहे, पुण्याचे वैभव आहे. शरद पवारांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही अर्थ दडलेला असतो. त्यांच्या या कृतीमागे काय राजकारण दडले आहे, ते लवकरच बाहेर येईल असा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली. पुण्यात आयोजित एका क ार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मेळाव्याच्या सांगता सभेत शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला होता. तसेच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात ’फुले पगडी’चाच वापर करण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावरून राजकीय विश्वात एकच चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला असल्याची प्रतिक्रीया राऊत यांनी दिली.