Breaking News

संगणकीकृत सातबारा उपलब्ध असलेल्या प्रतीच्या आधारे स्वाक्षरी करून सातबारा देण्याचे तलाठ्यांना आदेश


सांगली - सांगली जिल्हा सातबारा संगणकीकरणाचे काम माहे मे 2018 अखेर पूर्ण झाले आहे. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे (एन.आय.सी.चा सर्वर बंद असल्याने) संगणकीकृत 7/12 मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांची अडचण दूर व्हावी व त्यांना सातबारा मिळावा यासाठी घोषणापत्र 3 झालेला जो सातबारा आहे व जो मूळ हस्तलिखित सातबारा आहे. या दोन्हीची शहानिशा करुन संगणकीकृत सातबारा उपलब्ध असलेल्या प्रतीच्या आधारे त्यावर तलाठ्यांची स्वाक्षरी करुन संबंधीत मागणी करणार्‍या शेतकर्‍यास, व्यक्तीस देण्याबाबत सर्व तलाठी यांना संबंधित तहसिलदारामार्फत आदेशित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिली. 
जिल्हाधिकारी म्हणाले, संगणीकृत सातबारा मिळण्यास अडचण येत असल्याची बाब असंख्य शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. सर्वर सुरु क रण्याबाबत सातत्याने जमाबंदी आयुक्त कार्यालयाशी तसेच शासनास संपर्क करण्यात येत आहे. सातबारा मिळण्यास अडचण असेल तर तहसिलदार यांच्याशी संपर्क करावा. तथापी तांत्रिक क ारणामुळे संगणकीकृत सातबारा देताना अडचण येत आहे ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. संबधित तांत्रिक अडचण ही सांगली जिल्ह्यापुरती नसून महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात देखील झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संगणकीकृत सातबारामध्ये जर काही चूक, मूळ सातबाराशी पडताळणी केली असता निदर्शनास आल्यास, ही महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 कार्यपध्दती अवलंबून दुरुस्त करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.