सुशिक्षित वर्गापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत - खा. वंदना चव्हाण
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने सुशिक्षित वर्गापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत, आरोग्य क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात द्यावा ’ असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांनी केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
खा. चव्हाण म्हणाल्या, डॉक्टर मंडळी सुशिक्षित, प्रगल्भ समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. डॉक्टर सेलमधील डॉक्टरना अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतून वेळ काढून पक्ष कार्य करावे लागते. तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करुन डॉक्टरांनी सेलचे उपक्रम सर्व स्तरात पोहोचवावेत . रुग्णसेवेच्या क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहावे.
