Breaking News

‘सर्व शिक्षणा’त पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे


कोपरगाव प्रतिनिधी 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीत विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे. तर दुसरीकडे प्राथमिक शिक्षण गरजेचे असताना व सर्व शिक्षा अभियान सुरु असताना पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे आहे. 

आपला पाल्य हा उच्शिक्षित व्हावा म्हणून पालक आपली आर्थीक परिस्थीति नसताना सुधा पाल्याला इंग्रजी मद्यमाच्या शाळेकडे प्रवेश घेण्या साठी धड़पडत् आहे . त्यासाठी शिक्षण संस्थेला देणगी देऊन प्रवेश मिळविला जात आहे . परिणामी जिल्हा परिषद व् नगर परिषदे मार्फ़त चलविल्या जाणाऱ्या मराठी माध्यमाच्या प्राथमीक शाळा ओस पड़त चलल्या आहे त्यामुळे या शाळा चालू ठेवण्यासाठी या शाळेतील शिक्षकाना विद्यार्थी शोधत व् त्यांना काहीतरी अमीष दाखवत मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी तयार केले जात असल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेऊन त्यावर वेगवेगळ्या जाहिराती व प्रलोभणे दाखविली जात आहेत. तसेच शिक्षक शाळेच्या वेळेव्यतिरिक्त घरोघरी , वाडीवस्त्यावर जाऊन मुलांना मराठी माध्यमाकडे प्रवेश घेण्यासाठी भाग पाडत आहेत जर अशीच परिस्थीती राहीली तर या मराठी शाळा बंद होऊन तिथे काम करणारे असंख्य शिक्षक व् कर्मचारी बेरोजगार होऊन यांच्यावर उपासमरीची वेळ आल्या शिवाय राहणार नाही.