Breaking News

माटुंगा उड्डाणपुलाखाली मॅनहोलचे झाकण विशिष्ट हेतूने उघडल्याचा संशय

मुंबई, दि. 09, जून - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ’एफ उत्तर’ विभागातील ’पाच-उद्यान’ परिसराजवळील एका ’मॅनहोल’चे झाकण अनधिकृतपणे उघडे असल्याचे काल आढळून आले होते. कि मान 2 व्यक्तींनी विशिष्ट प्रकारचा ’आकडा’ हा ठराविक पद्धतीने वापरल्यानंतर हे झाकण उघडता येते. तसेच कामाच्या आवश्यकतेनुसार केवळ महापालिका कर्मचारीच हे झाकण उघडू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे झाकण उघडताना त्याच्या जवळ इशारा देणारा फलक वा झेंडा लावणे, तसेच महापालिकेचे कर्मचारी काम होईस्तोवर तेथे उभे असणे बंधनकारक आहे. मात्र झाक ण उघडण्याच्या कालच्या घटनेबाबत विशिष्ट हेतूने समाज विघातक प्रवृत्तींनी सदर झाकण उघडले असण्याचा संशय आहे. या अनुषंगाने आज महापालिकेच्या ’एफ उत्तर’ विभागाद्वारे माटुंगा पोलीस ठाण्यात संबंधित / अज्ञात इसमांविरुद्ध पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती ’एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या ’एफ उत्तर’ विभागात माटुंगा, शीव, वडाळा प्रतिक्षा नगर, ऍन्टाप हिल यासारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. यापैकी माटुंगा परिसरात पाच उद्यानाजवळील (ऋर्ळींश ॠरीवशप) नानालाल मेहता उड्डाणपुलाखाली व भूखंड क्रमांक 595 च्या जवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पर्जन्यजल वाहिन्या खात्याच्या जलवाहिनीवरील एक मॅनहोल आहे. या मॅनहोलचे झाकण काल 7 जून रोजी संशयास्पदरित्या उघडे असल्याचे आढळून आले होते. मॅनहोलचे असे उघडे झाकण नागरिकांच्या जिवितास धोकेदायक ठरु शकते. सुमारे 3 फूट ु 2 फूट एवढा आकार असणा-या या मजबूत व वजनदार लोखंडी झाकणाची जाडी 25 मिमि (सुमारे 1 इंच) एवढी आहे. काही विशिष्ट हेतूने किंवा सनसनाटी पसरविण्याच्या दृष्टीने हे वजनदार झाकण उघडण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. ही बाब लक्षात घेऊन याबाबत पोलीस चौकशी व्हावी व गुन्हेगारांना शासन व्हावे, या उद्देशाने महापालिकेच्या ’एफ उत्तर’ कार्यालयाद्वारे पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती उबाळे यांनी दिली आहे.