Breaking News

स्वच्छता मोहीम ‘निर्मल दिंडी पारितोषिक’ची घोषणा

पुणे, दि. 18, जून - अमेरिकेतील प्रख्यात पीडियाट्रिक स्पेशालिस्ट डॉ. जगन्नाथ सुरपुरे आणि रतन सुरपुरे यांच्या तर्फे पंढरीच्या आषाढी वारी दरम्यान अनोखी स्वच्छता मोहीम ‘निर्मल दिंडी पा रितोषिक’ची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. सुरपुरे यांनी सलग दोन वर्षे वारीत सहभाग घेतला, त्यावेळी वारी दरम्यान राखली जाणारी स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. तसेच वारक-यांच्या स्वयंस्फूर्त प्रयत्नांना पारितोषिकाच्या रूपाने प्रोत्साहन मिळाल्यास स्वच्छतेविषयी अधिक जागरूकता होण्यास मदत होईल, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. रतन सुरपुरे म्हणाले, समाजातील सर्व स्तरांतील आणिंतील भाविकांना ही वारी आकर्षित करते. अनेक चांगले पुढाकार आणि उपक्रम या वारी दरम्यान विविध स्वयंसेवी संस्था आणि संस्थांकडून घेतले जातात. जसे की आरोग्य शिबिरे आम्हांला देखील या चांगल्या उपक्रमाचा भाग होण्याची इच्छा असून स्वच्छतेला अधिक प्रोत्साहन द्यायचे आहे, यासाठी आम्ही ‘निर्मल दिंडी पा रितोषिक’ ही संकल्पना सादर केली आहे. आमचा मुख्य उद्देश्य स्वच्छतेच्या बाबतीत अधिक जागृती करणे हा आहे.