दूध उत्पादक शेतकर्यांना मदतीसाठीकेंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- सदाभाऊ खोत
सोलापूर - ऊस उत्पादक शेतकर्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकर्यांनाही मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.अक्कलकोट येथे आज श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषदेच्या क ृषी विभागामार्फत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन उद्या, सोमवारपर्यंत सुरु राहणार आहे.
श्री. खोत म्हणाले, ऊस उत्पादकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहिर केले आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांना भाव मिळावा यासाठी साखरेचा विक्री दर निश्चित केला. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना मदत देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकर्यांना अनुकुल ठरेल असे निर्यात धोरण राबवण्यावर केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य शासन राज्यातील शेतकर्यांच्या मागण्या केंद्र सरकारच्या दरबारी मांडत आहोत, असे श्री. खोत यांनी सांगितले.
कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी आणि उत्पादक यांच्यात दुवा तयार होतो. शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यांना नवीन माहिती मिळते यासाठी कृषी प्रदर्शन भरवणे आवश्यक आहे, असे श्री. खोत यांनी सांगितले.
यावेळी कृषी विभागाच्या वतीने प्रकाशीत करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
