Breaking News

केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद शनिचरणी


सोनई ( प्रतिनिधी )  
केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र शिंगणापूरला शनिदेवाचे दर्शन घेतले. त्यांचे स्वागत भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी केले. केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या भेटीनंतर लगेचच रविशंकर प्रसाद यांची भेट महत्वाची मानली जात आहे. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात सहकुटुंब शनी अभिषेक केला. देवस्थानच्या सुविधांची माहिती घेतली. जागतिक दर्जाच्या या देवस्थानमध्ये अजून सुविधा व्हायला पाहिजे व त्यासाठी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी त्यांना केली. ते पुढे म्हणाले की शिर्डी-शिंगणापूर हा चार पदरी रस्ता लवकरात लवकर मार्गी लागणार असून तसे मी संबधितास सूचना करतो. शनि-शिंगणापूर येथील इतिहास समजून घेत असताना बँक, घरे यांना कुलूप नसल्याची ऐकताच आश्चर्य व्यक्त केले. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ तांबे, तालुका अध्यक्ष युवा सतिश कर्डीले, निरंजन डहाळे, सुनिल वाघ, बाळासाहेब बोरुडे, प्रताप चिंधे , सयाजी शेटे, बाळासाहेब कुऱ्हाट, अनिल शेटे, महेंद्र आगळे, बंडू शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने डॉ. रावसाहेब बानकर व विश्वस्त शालिनीताई लांडे यांनी सत्कार केला.