राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात आरोप निश्चित
ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या एका खटल्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधत भिवंडी कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहे. मात्र राहुल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचं न्यायालयात स्पष्ट केलं आहे. 6 मार्च 2014 रोजी राहुल गांधी यांनी एका निवडणुक प्रचार सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधी यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजेश कुंटे या स्थानिक कार्यकर्त्याने राहुल यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. कुंटे यांनी भादंवि कलम 499 आणि 500 अंतर्गत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर 2 मे रोजी न्यायालयाने राहुल यांना 12 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर येत्या 10 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. यावेळी राहुल यांच्यासोबत काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत उपस्थित होते. महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
लढाई विचारधारेसाठी : राहूल गांंधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी मंगळवारी भिवंडी कोर्टात सुनावणी पार पडली, यावेळी राहूल गांधीनी आरोप फेटाळले असून, आपल्यावरील आरोप मान्य नाहीत, असे कोर्टात सांगितले. मात्र राहुल गांधींवर दोषारोपपत्र ठेवून खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.
असे खटले होत राहतील. मात्र माझी लढाई विचारधारेसाठी सुरु आहे आणि ती नक्की जिंकू, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विशेष वागणूक दिली गेली. मी याचिकाकर्ता असूनही मला कोर्ट रुममध्ये प्रवेश दिला गेला नाही, मात्र राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते आत गेले होते. पोलिस एकांगी भूमिकेत दिसत होते, असे म्हणत याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी नाराजी व्यक्त केली.