Breaking News

नक्षलवादी छावण्यांमधून शस्त्रे, दारूगोळा जप्त

सुकमा - छत्तीसगडमधील विविध नक्षली छावण्यांवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कृती दल (एसटीएफ) व कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अ‍ॅक्शन (कोब्रा) यांच्या संयुक्त कारवाईत ही कामगिरी पार पडली. पोलमपल्ली, चिंतागुफा, भेजी व किस्ताराम या ठिकाणांमधील नक्षली छावण्यांवर धाडी टाकण्यात आल्या.सुकमा येथील कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला उत्तर देताना एसटीएफचे दोन जवान जखमी झाले. या जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंतेवाडा इथे नक्षलवाद्यांनी शुक्रवारी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 231 बटालियनचे दोन जवान जखमी झाले.