Breaking News

पेट्रोलचे दर 15 पैशांनी उतरले


नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दर गेल्या सहा दिवसांपासून कमी झाले आहेत. या कालावधीत लिटरमागे काही पैशांनी पेट्रोलच्या किंमती उतरत आहेत. आज (सोमवार दि.4) देशातील पेट्रोलच्या दरात 15 पैशांची तर डिझेलच्या दरात 14 पैशांची कपात करण्यात आली आहे. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 77.96 रुपये प्रतिलिटर इतके आहे. तर कोलकत्त्यात 80.60 रुपये आणि मुंबईत 85.77 रुपये झाला आहे. डिझेलच्या किंमती 14 पैशांनी उतरल्याने दिल्लीत 68.97 रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकत्त्यात 71.52 रुपये, मुंबईत 73.43 रुपये तर चेन्नईत 72.82 रुपये प्रतिलियर डिझेलच्या किंमती झाल्या आहेत.