Breaking News

नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाचे यश

तालुक्यातील संवत्सर येथील प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ, लोणी संचलित नामदेवराव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा 94.87 टक्के, वाणिज्य शाखेचा 97.59 टक्के आणि कला शाखेचा 72.88 टक्के निकाल लागला असून महाविद्यालयात 12 वी वाणिज्य शाखेत जगताप गितांजली जनार्दन 80.61 टक्के प्रथम, जाधव आश्‍विनी संतोष 79.53 टक्के द्वितीय, सिनगर आशिती विनायक 78.76 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. 12 वी कला, शाखेतून पंडोरे आरती अशोक 72. टक्के प्रथम, फटांगरे पुजा भाऊसाहेब 67.23 टक्के द्वितीय, तर 12 वी विज्ञान शाखेतून जाधव भाग्यश्री सुरेश 68.92 टक्के प्रथम, परजणे अनिकेत सुधाकर 63.61 गुण मिळवून द्वितीय आला आहे.
12 वी बोर्ड परीक्षेत यशस्वी सर्व विदयार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि.प. अध्यक्षा ना. शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे, महाविदयालयाचे सेक्रेटरी डॉ. अनिलकुमार पुंड तसेच प्राचार्य प्रा. युवराज सदाफळ यांनी यशस्वी विदयार्थ्याचे कौतुक केले आहे.