Breaking News

वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटप उत्साहात


आश्वी : प्रतिनिधी

राज्याचे विरोधीपक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे पंडित नेहरु विद्यालय, जिल्हापरिषद शाळा आणि ग्रामपंचायतीच्या सयुंक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पचांयत समितीच्या सदस्या दिपाली डेंगळे, ज्येष्ठ कार्यकर्ते मछिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे, उपसरपंच अनिल डेगंळे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ खरात, डॉ. मुकंद जाधव, ठकाजी थेटे, बाळासाहेब डेंगळे, विनायक टिळेकर, अरुणा जोंधळे, संगिता साठे, आशा आरगडे, बी. जी. जोंधळे, मनिषा तळोले, राजेंद्र डेंगळे, प्राचार्य देशमुख, श्रीमती केदार आदींसह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पंडित नेहरु विद्यालय व राजे शिवाजी प्रतिष्ठानच्यावतीने विद्यार्थ्यांना गोड जेवन देण्यात आले होते. सूत्रसंचालन जोधंळे यानी केले. शिक्षक खेमनर यांनी आभार मानले.