उत्तर प्रदेशात गॅस सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू
लखनौ - उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन मुले व चार महिला असे एकूण सहा जण मृत्यूमुखी पडले आहेत. एका धार्मिक समारंभाच्या वेळी स्वयंपाक सुरू असताना हा स्फोट घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी चकबागली गावात घडलेल्या अशाप्रकारच्या अपघातात डझनाहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. प्रथमदर्शी माहितीनुसार, आझमगड येथील अपघात सिलिंडर गळतीमुळे झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
