पार्किंग जागा न वापरल्यास बांधकाम परवाना रद्द होणार
सोलापूर, दि. 21, जून - शहरात अनेक इमारतींना पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवली. पण तेथे बांधकाम करून जागा बंदिस्त करण्यात आली. त्यामुळे वाहने रस्त्यावर लावली जात आहेत. अशा इमारतीचा शोध महापालिकेने घेतला असून, त्यांचा बांधकाम परवाना रद्द करण्याबाबत महापालिका नोटीस देणार आहे. त्यानुसार तीन ठिकाणची नोटीस तयार करण्यात आली आहे. ते बजावल्यानंतर पार्किंगची जागा खुली करून त्यांचा वापर नाही केल्यास बांधकाम परवाना रद्द करण्यात येणार आहे.
अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने अर्ज मागवले. त्यास प्रतिसाद कमी मिळाला. सन 2001 पूर्वी शहरात जागा खरेदी केली असेल तर ते नियमित क रून देण्याबाबत महापालिकेने अर्ज मागवले. गुंठेवारी कायद्याअंतर्गत शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येत असाताना, बांधकाम परवानगी घेऊन त्यातील पार्किंग गायब करणार्यांना आता महापालिका नोटीस बजावणार आहे. त्यासाठी पालिका पातळीवर काम सुरू केले आहे. महापालिका बांधकाम परवाना विभागाक डून परवाना घेऊन इमारत बांधली. पण परवान्यातील नियमानुसार पार्किंग जागा न सोडता इतर कामासाठी वापरली आणि पार्किंगची जागा बंदिस्त करून तेथे वाहने लावली जात असतील तर त्या इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करण्यात येणार आहे. यानुसार रेल्वे लाइन, सरस्वती चौकासह तीन ठिकाणची नोटीस तयार करण्यात आली आहे. त्या जागा मालकांना महापालिका नोटीस बजावून, बांधकाम परवाना रद्द का करू नये? यांची विचारणा करणार आहे. ही मोहीम दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे.