सुप्यात अधिक मासानिमित्त हरिनाम सप्ताह
सुपा / प्रतिनिधी ।
पारनेर तालुक्यातील सुपा येथे हरिदास बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दत्त मंदिर व हरिदास बाबा समाधी मंदिरामध्ये दर महिन्याची शिवरात्र व अधिक मासानिमित्त त्रिदिणी अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला.
सोमवारी सकाळी 9 वाजता सरपंच भाऊसाहेब पवार, उपसरपंच राजू शेख, अॅड. बाळासाहेब पठारे, उपसभापती दीपक पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे, समता परिषदेचे सुभाष लोंढे, माजी सरपंच विजय पवार, उद्योजक योगेश रोकडे, स्वप्निल घुले, सुखदेव पवार, संदिप पवार, दिलीप पवार, अरुण ठोकळ आदींच्या उपस्थितीत कलश व विणा पुजन करण्यात आले.
सप्ताह दरम्यान पहाटे 5 ते 6 काकडा, 7 ते 9 समाधी अभिषेक, 11 ते 12 गाथाभजन, दुपारी 4 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 किर्तन व त्यानंतर हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.
सोमवारी दुपारी 4 ते 6 हभप शिवाजी महाराज काळे, हभप गितांजली कुलकर्णी यांचे प्रवचण तर रात्री 8 ते 10 संतसेवक महादेव महाराज काळे यांचे किर्तन झाले, मंगळवारी हभप पांडुरंग महाराज चव्हाण, नारायण महाराज कोल्हे यांचे प्रवचण व रात्री 8 ते 10 कृष्णकृपा मुर्ती भागवताचार्य हभप विकासानंद मिसाळ महाराज यांचे कीर्तन झाले. तर आजरोजी हभप. विकासानंद मिसाळ महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन हभप. गोविंद शितोळे, राजेंद शहाणे व हरिदास सेवा मंडळ, पांडुरंग सेवा मंडळ तसेच संगमेश्वर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.