रमजान विशेष - जगाला शांतीचा संदेश देणारा धर्म इस्लाम
सय्यद बबलूभाई, लेखक
खरा धर्म अगदी सुरूवातीपासुन एकच आहे. त्या सनातनी धर्माची शिकवणही एकच आहे. केवळ एकाच ईश्वराची आराधना, भक्ती करा. सर्वांचा पालनहार, विश्व विधाता एकमेव परमात्मा आहे. त्यालाच वेगवेगल्या भाषेत, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी नावे दिली गेली. जगाला शांतीचा संदेश देणार्या इस्लाम धर्माविषयी गैरमुस्लीम बांधवांमध्ये अनेक गैरसमज सातत्याने निर्माण करण्यात आले. जागतिक षडयंत्रे याकामी सतत सक्रिय राहुन हे कार्य बिनबोभाटपणे करत आहेत. इस्लाम धर्म समजुन घेण्यासाठी सर्वप्रथम प्रेषीत मोहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांचे जिवनचरित्र समजावुन घेणे आवश्यक आहे.
पृथ्वीतलावर ईश्वरी संदेश घेऊन अद्यापपर्यंत अनेक संदेष्ठे (पैगंबर) आले. त्या त्या काळातील जनतेला त्यांनी ऐकेश्वरवादाकडे निमंत्रीत केले. ईश्वराचे अंतीम प्रेषीत मुहम्मद (सल्ल.) यांच्या पुर्वी होवुन गेलेल्या सर्व प्रेषीतांवर अवतरीत झालेल्या प्रत्येक ग्रंथात एका अंतीम प्रेषीताची भविष्यवाणी केलेली असुन स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की त्या प्रेषीताचे आगमन झाल्यानंतर व त्याची ओळख पटल्यानंतर पुर्वीचे सर्व शास्त्र व धार्मीक नियम सोडुन देऊन त्याचीच शिकवण स्विकारली जावी. त्यांच्यावर अवतरीत झालेल्या ग्रंथावर व धर्मावर श्रद्धा ठेवावी. वेदांमधे या अंतीम प्रेषीताचे नाव नराशंस, पुराणामधे कल्की अवतार, बायबल मधे फारकलीट व अहेमद, बौद्ध धर्मात बुद्ध (मैत्रेय ) असा उल्लेख आलेला आहे. या सर्व धार्मीक ग्रंथांमधे प्रेषीत मुहम्मद (सल्ल.) यांचे जन्मस्थळ, जन्म तिथी, वेळ आणि बरीच लक्षणे फार पुर्वीच सांगन्यात आली होती. हजरत ईसा (अलै.)च्या 600 वर्षानंतर म्हणजे आजपासुन जवळपास साडे चौदाशे वर्षांपूर्वी समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी अंतीम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचा जन्म सऊदी अरब मधील मक्का येथे सन 570 इ.स. मधे झाला. त्यांच्या जन्मा अगोदर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. वयाच्या सहाव्या वर्षी आई आमीना यांचाही मृत्यु झाला. वयाच्या आठव्यावर्षी त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलीब यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांचे चुलते अबु तालीब करू लागले. विश्वातील हा सर्वांहुन वेगळा माणूस मक्केतील सर्वांचा आवडता व प्राणांहुन प्रिय बनला. त्याच्या सत्यदर्शी व प्रामाणिक पणामुळे लोकांच्या विश्वासास ते पात्र बनले.
वयाच्या 25 व्या वर्षी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी खदीजा नावाच्या विधवा महिलेशी विवाह केला. हा काळ खुपच असभ्य, अनैतीक, रानटी व हिंस्र वृत्तीच्या लोकांचा काळ होता. समाजात नितीमत्ता, दयाळुपणा, उदारता नव्हती. सगळीकडे अनाचार, हिंसा व अधर्म माजला होता. सामाजिक विषमता होती. प्रचंड भेदभाव होता. गुलाम स्त्री व पुरूषांची बाजारात खरेदी विक्री होत असे. गुलामांना जनावरांपेक्षाही भयानक वागणूक मिळत असे. गुलामांच्या अंगावर तेल ओतून त्यांना पेटवले जात व त्याच्या उजेडात जल्लोष करत मेजवान्या होत. तलवारीला धार झाली कि नाही हे आजमावण्यासाठी रस्त्यावरून चालणार्यांची मुंडकी सहजपणे उडविली जायची. नवजात स्त्री अर्भकांना जिवंत पुरन्याची अनिष्ठ प्रथा होती. बळी तो कान पिळी असाच काहीसा तो काळ होता. मुर्तीपुजा सर्रास होत होती. मक्का येथील काबा स्थळी 360 मुर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. मनुष्य निर्मीत विविध मुर्त्यांनाच ईश्वराचा दर्जा देन्यात आला होता. याच विचीत्र मुर्त्यांची पूजा केली जायची. हुबल, इसाफ, नाईला, उज्जा, लात, मनात आदी मुर्त्या तेथे बसवन्यात आल्या होत्या. प्रत्येक घरान्यांनी आपआपल्या मुर्त्यांची स्थापना केली होती. पुर्वी होवुन गेलेल्या पैगंबरांच्याही मुर्त्या काबात ठेवन्यात आल्या होत्या. यामध्ये पैगंबर हजरत इब्राहीम, हजरत इस्माईल, हजरत ईसा यांच्या मुर्त्या व चित्रेही होती.
अशा अडाणी व दुराचारी लोकांना सत्य मार्गावर आणण्याचे काम मोठे कठीण होते. अशा परिस्थीतीत पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे मन बेचैन होत असत. ते एका उंच डोंगरावरील निर्जन स्थळी गारे हिरा नावाच्या गुफेत जाऊन चिंतन करीत बसत असत. मक्कापासुन 6 मैल अंतरावर ही गुफा होती. ते 40 वर्षांचे असताना रमजानच्या पवीत्र महिन्यात एक फरीश्ता (देवदूत) तेथे प्रगट झाला. त्याने अल्लाहचा संदेश पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे पाहोचवीला. त्यानंतर वारंवार असे संदेश पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांना मिळु लागले. या दिव्य संदेशांचा संग्रह म्हणजेच पवित्र कुरआन शरीफ हा ग्रंथ होय.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) हेच संदेश लोकांना सांगु लागले-ईश्वर केवळ एकच आहे. त्याचा कुणीही भागीदार नाही. तोच पुजनीय आहे. केवळ त्याचीच भक्ती करा. त्या अल्लाहनेच मला पैगंबर (नबी) म्हणजेच इश्वराचे संदेश लोकांपर्यंत पाहोचवीणारा बनवीले आहे. कुरआन या पवित्र ग्रंथामार्फतच लोकांना सत्य मार्गाचे ज्ञान होत आहे. ज्यांनी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या या संदेशांवर विश्वास ठेवला त्यांनाच मुस्लीम अर्थात मुसलमान म्हटले गेले. मुस्लीम म्हणजे आज्ञाधारक, आज्ञा पालन करणारे व स्वत:ला ईश्वरी आज्ञेवर समर्पीत करणारे.
त्यांची पत्नी खदीजा (रजी.) यांनी पैगंबरांच्या या संदेशावर विश्वास ठेवुन पहिली मुस्लीम होन्याचा मान मिळवला. त्यानंतर त्यांचे चुलत बंधु अली (रजी.), मानस पुत्र जैद (रजी.), मित्र अबू बक्र सिद्दिक (रजी.) हे ही मुसलमान झाले. मुसलमान होण्यासाठी-अश्हदु अल्ला इलाह इल्ल ल्लाहु व अश्हदु अन्न मुहम्मदर्रसुलुल्लाह. म्हणजेच मी साक्ष देतो की अल्लाहच्या शिवाय कोणीही पुज्यनिय नाही व मी साक्ष देतो की मुहम्मद (सल्ल.) अल्लाहचे पैगंबर व प्रिय आहेत. हे मनाशी पक्के करणे होय. मक्काचे इतरही अनेक लोक अशी साक्ष देत मुसलमान झाले.
इस्लामचा वाढता प्रसार व प्रतीसाद कुरैश सरदारांच्या लक्षात आला. ते संतप्त झाले. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) हे आपल्या पुर्वजांच्या धर्माविरूद्ध, बहुदैव वाद व मुर्तीपुजेच्या विरोधात नव्या धर्माचा प्रसार व प्रचार करत आहेत व जुन्या पूर्वजांच्या धर्माला संपवीत आहेत ही गोष्ट त्यांना चांगलीच खटकली. मक्केचे सर्व बहुदैववादी व काफीर (नास्तीक) सरदार एक झाले. त्यांनी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या विषयी चुलते अबू तालीब यांच्याकडे याविषयी तक्रार केली. पैगंबरांना समजावुन सांगा. नव्या धर्माचा प्रसार बंद करा व आपल्रा पुर्वीच्याच धर्माचे पालन करा असा सल्ला दिला. मात्र पैगंबर मुहम्मद (सल्ल.) रांनी - ला ईला ह इल्ललाह या सत्याचा प्रचार सोडन्यास स्पष्ट नकार दिला व माझ्या एका हातावर सूर्य व दुसर्यावर चंद्र जरी ठेवला तरी या सत्य मार्गापासुन हटणार नाही जो ईश्वराने सांगीतला आहे असे (क्रमश:)