दखल का केली असेल भय्यूजींनी आत्महत्या?
शाश्वत काय आणि अशाश्वत काय हा सामान्य माणसाच्या बौध्दीक औकाती बाहेरचा मुद्दा. या पातळीवर जेंव्हा जेंव्हा सामान्य माणूस जेंव्हा जेंव्हा दिशाहीन होतो,परिस्थिती हाताळण्यास हतबल ठरतो तेंव्हा गुरूच्या शोधात निघतो आणि एका योग्य वेळी शोध पुर्ण होऊन त्याचा मार्ग सापडतो. जीवनाचा अर्थ सापडून आयुष्याची वेगळी दिशा मिळते.मार्ग दाखवणारी ही शक्ती कुणा व्यक्तीच्या माध्यमातून भारतवर्षात चांगली परिचीत आहे.
शाश्वत काय आणि अशाश्वत काय हा सामान्य माणसाच्या बौध्दीक औकाती बाहेरचा मुद्दा.या पातळीवर जेंव्हा जेंव्हा सामान्य माणूस जेंव्हा जेंव्हा दिशाहीन होतो,परिस्थिती हाताळण्यास हतबल ठरतो तेंव्हा गुरूच्या शोधात निघतो आणि एका योग्य वेळी शोध पुर्ण होऊन त्याचा मार्ग सापडतो. जीवनाचा अर्थ सापडून आयुष्याची वेगळी दिशा मिळते.मार्ग दाखवणारी ही शक्ती कुणा व्यक्तीच्या माध्यमातून भारतवर्षात चांगली परिचीत आहे.
इंदोरस्थित राष्ट्रसंत भय्यूजी महाराज हे याच शक्तीचे मानवी रूपातील नाव.हजारो,लाखो करोडोंना जीवनाचा अर्थ समजावून आयुष्याला नवे वळण देणारी शक्तीच जेंव्हा हतबल ठरते तेंव्हा नैराश्याच्या अंधारात चाचपडणार्या तुम्हा आम्हांसारख्या सामान्य जीवांनी कुणाकडे पहायचे? असा प्रश्न युवा राष्ट्रसंत, एकविसाव्या शतकात थोर समाजसेवक आणि राजकारणातील अध्यात्मिक गुरू म्हणून सुपरिचीत असलेले भय्यूजी महाराजांच्या अकाली एक्झीटमुळे निर्माण झाला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर तर्क वितर्कांच्या असंख्य वावड्या उठत असल्या तरी एका निर्णायक वळणावर थांबून या घटनेकडे पहावे लागणार आहे.
आठपंधरा दिवसापुर्वीच राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी धुळे येथे येऊन समाजातील अनाथ मुलांसाठी आश्रम काढण्याचा संकल्प सोडला होता.केवळ आश्रम उभा करून त्यांच्या पोटाचा आणि निवार्याचा प्रश्न सोडवून शांत न बसता त्यांना आपले नाव देऊन सनाथाची ओळख ते देणार होते.तथापि त्या सर्व अनाथ जीवांचे नशीब दुर्दैवी ठरले आणि ही संकल्पना आपल्या अनुयायांजवळ सोडून भय्यूजी महाराज समाज आणि त्या संकल्पनेला पोरके करून गेले.
मंगळवारी दुपारी भय्यूजी महाराजांनी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त व्हायरल झाले आणि सर्वदूर समाजमन गर्भगळीत झाले.महाराज आणि आत्महत्या हे दोन शब्द एकञ नांदणे अशक्य अशक्य आणि अशक्यच! एव्हढा दृढ विश्वास असलेल्या प्रत्येकाचा या वृत्तावर विश्वास बसणे शक्य नव्हते.प्रत्येकासाठी ही बातमी पंधरा वीस रिश्टर स्केलचा धक्का होती.
माञ सर्वांच्या दुर्दैवाने दुर्घटना खरी ठरली.आज महाराज आपल्यात नाहीत.माञ त्यांनी केलेले समाजकार्य प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले आहे.आणि आणखी कित्येक वर्ष हे काम भय्यूजी महाराजांची आठवण देत राहणार आहे.आणि त्या प्रत्येक आठवणीच्या आत्महत्येची सल बोचत राहणार आहे.का केली असेल आत्महत्या?ज्यांनी हजारोंना आत्महत्येपासून परावृत्त केले,हजारो आत्महत्याग्रस्तांच्या पुढच्या पिढीला जगण्याची उमेद दिली,अनाथांना नाव देण्याचा संकल्प सोडला तो आधारवड आतून पोखरला जावा. हतबल ठरावा. आणि तत्वज्ञान झिडकारून अतार्किक शरणागती स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा,एव्हढे महाराज दुबळे नक्कीच नव्हते.
संपत्तीचा सोस आणि संपत्तीवरून होणार्या वादापुढे झुकतील एव्हढे कमकुवत नव्हते. म्हणूनच महाराजांच्या पश्चात उठत असलेल्या वावड्या कुठेतरी तार्किकतेवर चोखाळून तपास व्हायला हवा, इतकीच इच्छा आणि अनुयायांनी उरलेले काम पुढे नेऊन त्यांचे नाव चिरकाल जपावे. ही त्यांना खरी श्रध्दांजली!
