छगन भुजबळ आज होमग्राऊंडवर दोन वर्षांच्या प्रतिक्षेला उत्साहाची सजावट
नाशिक : अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ आपल्या होमग्राऊंडवर परतणार आहेत. गुरुवारी त्यांचे आगमन होत असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, त्यांच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र ज्यांच्यामुळे छगन भुजबळ यांच्यापासून सर्व सामान्य कार्यकर्ता या क्षणापर्यंत दूर राहिला त्यांचाच वावर साहेबांच्या अवतीभोवती राहणार की त्या धोरणात बदल होतो हे पहाणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच सक्त वसुली संचालनालय यामुळे चोवीस महिने कारागृहात राहिल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर भुजबळ हे मुंबईतच रुग्णालयात होते. दि. 10 जून रोजी त्यांनी पुणे येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात घणाघाती भाषण करून राजकारणात कमबॅक केले. आता ते गुरुवारी (दि. 14) नाशिकमध्ये येणार असून, दुपारी 12 वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला तसेच तेथून गणेशवाडीत महात्मा फुले आणि त्यानंतर सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते अधिकृत दौर्याला सुरुवात करतील. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी भवनात गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुसर्या दिवशी ते येवला मतदारसंघात जाणार असून, तेथे देखील अभ्यागतांसाठी वेळ देणार आहेत. त्यानंतर मात्र ते शिर्डीला जाणार असून, साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये परतल्यानंतर शनिवारी कळवणला भेट देणार आहेत.
दाौर्याकडे सामान्य माणसाची नजर आहे, परंतु या दौर्यात पुन्हा तोच गोतावळा दिसतो की या गोतावळ्यामुळे साहेबांपासून दुर राहिलेला सामान्य माणसाला साहेब जवळ करतात यावर येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील भुजबळ पर्वाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.