प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असलेले प्रा. संदीप बेडसे शिक्षकांना न्याय देतील - टिडीएफचा विश्वास
नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफ तर्फे धुळ्याचे प्रा. संदीप बेडसे अधिकृतपणे उमेदवारी करीत आहेत. विभागीय टिडीएफ मध्ये फूट पडल्याचा गवगवा जरी होत असला तरी प्रा. बेडसे यांना सर्वत्र मिळत असलेला पाठिंबा त्यांच्या विजयाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास समर्थक, हितचिंतकांनी व्यक्त केला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी मतदान होत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट) आणि शेतकरी कामगार पक्ष महाआघाडी तसेच शिक्षक कामगार पक्ष महाआघाडी तसेच शिक्षक भारतीने समर्थन दिलेले टीडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा. संदीप त्र्यंबकराव बेडसे यांनी गेल्या अडीच महिन्यांपासून विविध स्तरांवर आपले वलय मजबूत केले आहे. विशेषतः सव्वा वर्षापासून ते याकामी तयारीला लागले आहेत. आज निवडणुक रिंगणात असलेल्या 16 इच्छुकांपैकी प्रा. बेडसे हे आघाडीचे ठरले असून, त्यांनी आजवर केलेल्या प्रचारात शिक्षक, शिक्षण संस्थाचालकांच्या संपर्कात अव्वल स्थानी आपले स्नेह तसेच घनिष्ठता निर्माण केल्याचे चित्र आहे. प्रतिस्पर्धी, विरोधक यांना समर्थ मात देणारेे व्यक्तीमत्व म्हणून प्रा. संदीप बेडसे यांच्याकडे पाहिले जाते. माघारीअंती निवडणुक रिंगणात अनिकेत विजय पाटील, भाऊसाहेब कचरे पाटील, सुनील पांडुरंग पंडित, अजितराव किसान दिवटे, आप्पासाहेब रामराव शिंदे, अशोक शंकर पाटील, किशोर भिकाजी दराडे, रवींद्र भिवाजी पटेकर, विलास शांताराम पाटील, विठ्ठल रघुनाथ पानसरे, प्रताप नारायणराव सोनवणे, बाबासाहेब संभाजी गांगुर्डे, भिरूड शाळीग्राम ज्ञानदेव, महादेव साहेबराव चव्हाण, मुख्तार अ.मो. कासीम हे इच्छुक उतरले आहेत.
यापैकी प्रा. बेडसे हे अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुले व नंदुरबार जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांमध्ये आपले प्रचारकार्य अधिक दमाने प्रतिबिंबित करण्यात सरस ठरल्याचे शिक्षक मतदार संघातून बोलले जाऊ लागले आहे.