त्या चिमुरडीचा अतिप्रसंग करून खून ग्रामिण गुन्हे शाखेच्या कर्तव्य दक्षतेचे कापले नाक
वाडिव्रहे/प्रतिनिधी । 13 :
इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या 14 दिवसापासून बेपत्ता असलेल्या 5 वर्षीय बालिकेची हत्या झाल्याचे उघड झाले असून या घटनेने स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्षतेचे नाक कापले गेले आहे. दरम्यान या गुन्ह्यातील संशयिताने कबुली दिल्याचे वृत्त आहे. या बालिकेवर अतीप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यावर दगड घालून गळा आवळून हत्या केल्याची कबूली संशयिताने दिली.
पोलिसांनी आज या बालिकेचा निर्जनस्थळी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. आवळी दुमाला येथील पाच वर्षाची बालिका गेली 14 दिवसापासुन बेपत्ता होती. याबाबत बालिकेचे वडील रमेश जमधडे यानी घोटी पोलिस स्टेशनला मुलीचे गोपीनाथ दत्तू जमधड़े या संशयित व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार केली होती. या मुळे या बालिकेला शोधण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसासमोर उभे राहिले या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयिताला शहापुर येथील एका हॉटेल मधून ताब्यात घेतले होते. याची सखोल चौकशी केली असता सदर बालिकेला चॉकलेट चे अमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता तिने आरडाओरडा केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून तसेच गळा आवळून हत्या केल्याची तसेच तिचा मृतदेह गावाजवळ एका निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात पुरले असल्याची कबूली संशयिताने दिली.
या नुसार आज तहसीलदार अनिल पुरे यांच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अडसूळ, संदीप हांडगे, नवनाथ गुरुळे, शिवाजी जुन्द्रे, वैद्यकिय अधिकारी डॉ. लचके यानी संशयिताने दाखवलेल्या ठिकाणी शोध मोहीम राबवली तेथे सदर बेपत्ता बालिकेचा मृतदेहाचा सांगाडा कपडे व बांगड्या मिळून आल्या आहेत.
चौकट
कमाई देणार्या अवैध धंद्यांना टार्गेट स्वहस्ते पाठ थोपटून घेणार्या ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पाच वर्षाच्या चिमुरडीचा चौदा दिवस शोध घेता आला नाही. तिला जीव गमवावा लागल्यानंतर मात्र कर्तव्यतत्परतेचा आव आणला जात आहे.