महाराष्ट्रीयन मल्लखांब आता जपान ऑलिम्पिकमध्ये
मुंबई वृत्तसंस्था
२०२० साली जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये मल्लखांबच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मल्लखांब म्हणजे अस्सल भारतीयक्रीडा प्रकार मनाला जातो. देशभरातून अव्वल २४ मल्लखांबपटूंचे पथक जपानला जाऊन जगभरातील क्रीडाप्रेमींसमोर मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती सादरकरणार आहे.आठ फूट उंचीच्या मानवाकृती, गुळगुळीत आणि वरील भागात निमुळता होत जाणारा लाकडी मल्लखांब हा मूळ प्रकार मानला जातो. सर्वात उत्तममानला जाणारा शिसवीच्या लाकडाचा मल्लखांब हा जमिनीच्या आत सुमारे दोन फूट खाली गाडलेला असतो. अशा या मल्लखांबला आंतरराष्ट्रीय मंचावरसादरीकरणाची संधी मिळणार आहे. त्यातून मल्लखांबचा जगभरात अधिकाधिक वेगाने प्रसार होणेदेखील शक्य होणार आहे.
जगातील विविध देशांमध्ये नावलौकिक होऊ लागलेल्या अस्सल भारतीय मोजक्या खेळांपैकी एक म्हणून मल्लखांबची ख्याती होऊ लागली आहे. अत्यल्प वेळेतशरीराला सर्वाधिक व्यायाम घडवणारा क्रीडा प्रकार म्हणून मल्लखांब जगभरात उदयाला येत आहे. अशा या मल्लखांबच्या अस्सल देशी आणि महाराष्ट्रात उगमपावल्याचे मानले जात असलेल्या मराठमोळ्या खेळाला चांगले दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत.
