नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी १५ जुलै रोजी मतदान
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)-6ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10ब, वाई (जि. सातारा)- 5अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)-12अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2, मोहाडी (जि. भंडारा)- 12 आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.
