जनरल मोटर्सच्या सीएफओपदी सूर्यदेवरा
अमेरिका : अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. मेरी बारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव असून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केलेले आहे.
