दहशतवाद्यांकडून जवानाच अपहरण
श्रीनगर : दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सैन्याच्या एका जवानाचं अपहरण केलं. औरंगजेब असं अपहृत जवानाचं नावं असून ते पुंछ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. राज्याच्या पोलिसांसह सर्वांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले.
