Breaking News

संतोष शेळके यांना राजश्री शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाणचे माजी सरपंच व शिक्षक संतोष शेळके यांना पुणे येथील राजश्री शाहू महाराज व आंबेडकर सर्वधन समितीचा राजश्री शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. 
या समितीच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तीस विविध पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. संतोष शेळके हे शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील भैरवनाथ विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
विद्यालयातील विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून सहभागी करून घेतात. उरूळीकांचन येथे झालेल्या कार्यक्रमात औंरगाबाद विद्यापिठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संतोष शेळके यांना पुरस्कार देण्यात आला. 
संतोष शेळके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. विजय औटी, पं.स सदस्य गणेश शेळके, वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, भैरवनाथ विद्यालयाचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके, प्रा. तुकाराम बेनके, संभाजी कुटे, गोरक्ष डुबे, नितीन शेळके, तुषार पवार, अशोक शेळके, राजेंद्र शेळके, रविंद्र शेळके यांनी अभिनंदन केले.