Breaking News

दहुआ टेक्नॉलॉजीच्या पुरस्काराने मंदार मुळे सन्मानित

अहमदनगर । सी. सी. टी. व्ही. आणि सार्वजनिक सुरक्षा यंत्रणांच्या क्षेत्रात मोठे नाव असलेल्या नगरमधील मंदार मुळे यांना उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल प्राईडमध्ये पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारासाठी मंदार मुळे यांचे नामांकन झाले होते. जागतिक किर्तीच्या दहुआ टेक्नॉलॉजी कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सी. सी. टी. व्ही. क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून अद्ययावत तंत्रज्ञान वापरून कंपनीच्या व्यवसाय वृद्धीत मोलाची भर घातल्याने मंदार मुळे यांचा सन्मान झाला. यावेळी विन्सेंट (वरिष्ठ विक्री व्यवस्थापक, भारत), श्रीमती ज्योसी (विक्री व्यवस्थापिका, भारत) यांच्या हस्ते मंदार मुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मंदार मुळे हे नगर शहर व जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात सी सी टी व्ही, ऑफिस आणि होम सिक्युरिटी क्षेत्रात गेल्या 12 वर्षापासून कार्यरत असून, दहुआ या जागतिक दर्जाच्या कंपनीची उत्पादने वापरून त्यांनी सी. सी. टी.व्ही. क्षेत्रात नवनवीन तंत्र आणि उपकरणे आणली आहेत. आपले ऑफिस कार्यालय किंवा उद्योग व्यवसाय अधिक सुरक्षित करण्यासाठी दहुआ कंपनीच्या उत्पादनांची व तंत्रज्ञानाची मंदार मुळे यांच्या फर्मला खूप मदत झाली. मुळे यांनी व्यक्तिगत सिस्टिमबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सी.सी. टी.व्ही. यंत्रणा बसविण्याचे मोठे उपक्रम विविध सरकारी कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत यशस्वी करून दाखविल्या आहेत.