तरुण पिढीला दिशा देण्याचे काम व्हावे : तनपुरे
राहुरी तालुका प्रतिनिधी
तरुण पिढी घडविण्याचे काम विचारवंतांकडे आहे. ते त्या दिशेने कार्य करतात. मात्र दुर्दैव हे, की तरुणपिढी दिशाहिन आहे. तिला दिशा देण्याचे काम प्रतिष्ठानने करावे, असे प्रतिपादन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अरुण तनपुरे यांनी केले.
राहुरी येथे बहुउद्देशीय सामाजिक संस्था सम्राट प्रतिष्ठानच्या फलकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शिरिष गायकवाड होते. पंचायत समिती सभापती मनिषा ओहोळ, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजू आढाव, रिपाइं शहराध्यक्ष विलास साळवे, जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, राहुरी साखर कारखाना संचालक नंदकुमार डोळस, सरपंच कर्णा जाधव आदी प्रमुख विचारमंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, चांगला उपक्रम हाती घेऊन सम्राट प्रतिष्ठान चांगले काम करेल, असा मला विश्वास आहे. नवपिढी निर्माणासाठी प्रतिष्ठानने उचललेले पाऊल समाजाला दिशादर्शक ठरणार आहे. प्रगती होणे म्हणजे इतरांनाही पुढे घेऊन जाणे होय. महामानवांनी प्रतिकूल परिस्थितीत महान कार्य केले. तो आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी. आरडगावचे सरपंच कर्णा जाधव यांनी मनोगत केले.
याप्रसंगी अविनाश ओहोळ, प्रा. सयाजी खरात, डॉ. एस. के. कांबळे, नगरसेवक अक्षय तनपुरे, संजय साळवे, दिलीप चौधरी, किरण साळवे, सचिन साळवे, बबन साळवे, संदिप कोकाटे, राजू जगधने, ना. म. साठे, विधिज्ञ भाऊसाहेब पवार, अनुप साळवे, भूषण साळवे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, अनिल कोळसे, गोविंद फुणगे, विजय भोसले, सतिष फुलसौंदर, नाना पटेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सत्येंद्र तेलतुंबडे, संतोष जाधव, इंजिनिअर बबनराव अहिरे, संजय संसारे, मेघराज बचुटे, राजेंद्र पटेकर, कांतीलाल जगधने, बाबा गरुड, शरद पाचारणे, मनोज साळवे, संजय जाधव, पंचशिला तेलतुंबडे, छाया शिंदे, अनुराधा आहेर आदींनी प्रयत्न केले. प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मनिषा गायकवाड यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन अनुसंगम शिंदे यांनी केले. छाया गायकवाड यांनी आभार मानले.
