Breaking News

प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असलेले प्रा. संदीप बेडसे शिक्षकांना न्याय देतील टिडीएफचा विश्‍वास

नाशिक/प्रतिनिधी। विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफतर्फे धुळ्याचे प्रा. संदीप बेडसे अधिकृतपणे उमेदवारी करीत आहेत. विभागीय टडीएफमध्ये फूट पडल्याचा गवगवा जरी होत असला तरी प्रा. बेडसे यांना सर्वत्र मिळत असलेला बलाढ्य पाठिंबा त्यांच्या विजयाची नांदी ठरणार असल्याचा विश्‍वास समर्थक, हितचिंतकांनी व्यक्त केला आहे. 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी मतदान होत आहे. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकतांत्रिक जनता दल (शरद मादव गट) आणि शेतकरी कामगार पक्ष महाआघाडी तसेच शिक्षक भारतीने समर्थन दिलेले टीडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा. संदीप त्र्यंबकराव बेडसे यांनी गेल्या अडीच महिन्यांपासून विविध स्तरांवर आपले वलय मजबूत केले आहे. विशेषत. सव्वावर्षापासून ते याकामी तयारीला लागले आहेत. आज निवडणकू रिंगणात असलेल्या 16 इच्छुकांपैकी प्रा.बेडसे हे आघाडीचे ठरले असून, त्यांनी आजवर केलेल्या प्रचारात शिक्षक, शिक्षण संस्थाचालकांच्या संपर्कात अव्वलस्थानी आपले स्नेह तसेच धनिष्ठता निर्माण केल्याचे चित्र आहे. प्रतिस्पर्धी, विरोधक यांना उरुन पुरणारे व्यक्तीमत्व म्हणून प्रा. संदीप बेडसे यांच्याकडे पाहिले जाते. माघारीअंती निवडणूक रिंगणात अनिकेत विजम पाटील, भाऊसाहेब कचरे पाटील, सुनील पांडुरंग पंडित, अजितराव किसान दिवटे, आप्पासाहेब रामराव शिंदे, अशोक शंकर पाटील, किशोर भिकाजी दराडे, रवींद्र भिवाजी पटेकर, विलास शांताराम पाटील, विठल रघुनाथ पानसरे, प्रताप नारामणराव सोनवणे, बाबासाहेब संभाजी गांगुर्डे, भिरूड शाळीग्राम ज्ञानदेव, महादेव साहेबराव चव्हाण, मुख्तार अ. मा. कासीम हे इच्छुक उतरले आहेत.
यापैकी प्रा. बेडसे हे अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांमध्ये आपले प्रचारकार्य अधिक दमाने प्रतिबिंबित करण्यात सरस ठरल्याचे शिक्षक मतदारसंघामधून बोलले जाऊ लागले आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.बेडसे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिक्षक भारती यांच्यासह शिक्षण क्षेत्रातल्या विविध शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. पुरोगामी विचारांच्या घरातून मिळालेला वारसा टीडीएफ संघटनेच्या विचार धोरणांची वडिलांकडून मिळालेली समाजकार्याची शिदोरी घेऊन स्वत.मधील कुशल संघटक, प्रशासनातील कार्यपद्धतीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. बेडसे यांना सर्व थरातून समर्थन मिळत आहे. नाशिक विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या लक्षात घेता सरकारचे शैक्षणिक धोरण, शिक्षकांच्या विविध समस्या व अडचणींचे निराकरण होण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून नाशिक विभागातून अनेक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संघटना, संस्था यांनी प्रा. बेडसे यांना पाठिंबा दर्शविला आहे. शाळांचे कंपनीकरण, निवृत्तीवेतन, विनाअनुदानित, अतिरिक्त शिक्षक, दुर्गम भागातील शाळा याचबरोबर सरकारचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या मान्य करुन घेण्यासाठी प्रा. बेडसेंसारख्या नेत्यांची गरज आहे. त्यांच्या साथीने शिक्षक भारती अधिक सक्षमपणे लढण्यासाठी बलवान होईल. म्हणून शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला असून, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यासह इंडिपेंडेंट माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे, धुळे जिल्हा हिंदी अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर संघटना, माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय कर्मचारी सेवक संघटना, नॉर्थ महाराष्ट्र युनिर्व्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निदशे क सघं टना, व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक सघं , नाशिक विभाग अनुदानित आश्रमशाळा सबलीकरण संघटना, नाशिक विभाग कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, डी.टी.एड, बी.ए.ड.स्टुडंट असोसिएशन, अपंग समावेशित शिक्षक परिचर संघटना, जिल्हा खो-खो असोसिएशन, धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, विमुक्त जाती भटक्या- जमाती आश्रमशाळा कर्मचारी संघटना, नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्था संघासह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्याच्या बलबुत्यावर प्रा. संदीप बेडसे हे निवडणुकीत चमत्कार दाखविणार असल्याचा मनसुबा त्यांच्या चाहत्यांनी बोलून दाखविला आहे.