Breaking News

माजी आमदार दगडू बडे यांचे निधन

उसतोडणी कामगारांचे नेते व माजी आमदार दगडु पाराजी बडे (वय - ८१ वर्षे) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शीलाबाई, मुले कल्याण व धनंजय आणि चार मुली असा परिवार आहे. .

ऊसतोडणी कामगारांना संघटित करण्याची सुरुवात १९८० साली बडे व माजी मंत्री बबन ढाकणे यांनी केली. भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी मतदार संघात कमळ फुलविण्याचे काम पहिल्यांदा दगडु बडे यांनी केले. उपेक्षीत असणाऱ्या तोडणी कामगारांचे संघटन करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचे काम केले. वडगाव येथील बेलपारा मध्यम प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. गावचे पोलिस पाटील पदापासून सुरुवात केली.

गावचे सरपंच, सेवा सहकरी संस्थेचे चेअरमन, पंचायत समिती सदस्य, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व विधानसभा सदस्य अशी पदे त्यांनी भूषविली. त्यानंतर सामाजिक कामात सातत्याने पुढे राहणारे बडे यांनी १९९९ साली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी केली. माजी मंत्री बबन ढाकणे व दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांचा पराभव करुन ते विधानभवनात गेले होते.