Breaking News

लाच घेतांना मंडलाधिकारी कवडे गजाआड


कोपरगाव शहर प्रतिनिधी : तालुक्यातील कुंभारी येथील एका नागरिकाने नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हास कवडे यांना माहेगाव येथे १४ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. 

यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, सदर तक्रारदार यांनी त्यांचे आई ,भाऊ व स्वतःच्या नावे ३ प्लॉट खरेदी केले आहेत. त्यांच्या खरेदीखताची नोंदणी होऊन ७ / १२ उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबादल्यात मंडलाधिकारी कवडे यांनी तक्रारदार यांच्याकडे १४ हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान, सदर लाचेची रक्कम कवडे यांनी आज {दि. १२} पंचासमक्ष स्विकारली. यासंदर्भात नाशिक लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार सापळा लावण्यात आला होता. यामध्ये सापळा अधिकारी एम. एम. नाईक, पोलीस निरीक्षक पो. ना. प्रवीण महाजन, शिरिष अमृतकर, दीपक उशारे, पो. कॉ. दाभोळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी कारवाई केली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.