Breaking News

संविधान वाचवण्यात न्यायालयाची भूमिेका महत्त्वाची : अ‍ॅड. आंबेडकर

पाटना - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान बदलण्यासाठी काम करत आहे, तर सर्वोच्च न्यायालय संविधान वाचवण्यासाठी महत्वाची भूमिका घेत असल्याचे मत भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तेे ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ रॅलीत सहभागी होण्यासाठी पाटणा येथे आले होते, त्यावेळी रॅलीला संबोधित करतांना आंबेडकर बोलत होते. 

आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपला बनियांचा पक्ष, तर राहुल गांधी यांना चांगला नेता असल्याचे मत व्यक्त केले. आंबेडकर म्हणाले, की स्वातंत्र्यात ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिले ते खूप महत्त्वाचे आहे. मोदी हिटलरशाही करत असून लोकशाहीला वाचवायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांना संसदेत पाठवावे लागेल. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) लक्ष्य केले. ते म्हणाले, की आरक्षण संपवण्याच्या मार्गावर असून खासगीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. दलितांचे मोठ मोठे नेते आरएसएसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. यावेळी आंबेडकर यांनी सर्वाच्च न्यायालय संविधान वाचवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडत असल्याचेही नमुद केले. आरएसएस संविधान बदलण्यासाठी जे काम करत आहे, ते थांबवण्यात सर्वोच्च न्यायालय चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा करताना हेही नमुद केले की काँग्रेसमध्ये मनुवादी नेत्यांचेही प्रमाण मोठे आहे. या रॅलीत माजी सभापती उदय नारायण चौधरी, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतन लाल यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.