Breaking News

अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार : 5 ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 5 जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयातच हा गोळीबार झाला. वॉशिंग्टनच्या पश्‍चिमेस हे शहर आहे. याप्रकरणी एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्वटिरवर याची माहिती दिली. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱयांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक ठार झाले आहेत.जेव्हा तुम्ही डेस्कच्या खाली असता आणि तुम्हाला लोकांवर गोळीबार होत असल्याचे आणि बंदुकधारी व्यक्ती गोळया रिलोड करतानाचा आवाज ऐकू येत असतो, तेव्हा यापेक्षा भयावह काही असू शकत नाही, असे डेव्हिसने म्हटले आहे.