Breaking News

गायकवाड हत्याप्रकरणी 5 जणांना घेतले ताब्यात

सोलापूर, दि. 20, जून - पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून विकी गायकवाड यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 11 जणांच्या विरोधात कुर्डुवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल क रण्यात आला होता. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे. कुर्डुवाडी येथील बार्शी टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्यावरील जुना टोल नाक्याजवळील गारवा हॉटेलजवळ विकी गायकवाड (वय 23, रा. माळशिरस) याची भर दिवसा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. कुर्डुवाडी पोलिस ठाण्यामध्ये संतोष माने यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये माणिक श्रीरामे, आकाश राजगिरे, विनोद सोनवणे, अनंत सोनवणे, आकाश श्रीरामे, अर्जुन श्रीरामे, संतोष मारकड, बापूसाहेब जगताप, सूरज जगताप, आक्रम खान, इमरान पठाण यासह इतर 10 ते 12 जणांवर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांना घेतले ताब्यात : आकाश राजगे, विनोद सोनवणे, आकाश श्रीरामे, अर्जुन श्रीरामे व आक्रम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले इतर संशयितांचा तपास सुरू आहे.