Breaking News

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे अग्नी-5 या क्षेपणास्त्राची रविवारी ओडिशाच्या बालासोर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.

चंडीपूर/वृत्तसंस्था : भारताकडून रविवारी संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि 5 चे यशस्वी प्रक्षेपण ओडिशाच्या बालासोर येथील अब्दुल कलाम समुद्रीय बेटावर क रण्यात आले. 5 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणार्‍या अग्नी-5 ची यंत्रणा आणि उपयंत्रणा एसएफसीकडे सोपवण्यात आल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण चीन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असणार आहे. यासोबतच युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागदेखील या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असतील. ‘अग्नी-5’ची सहावी चाचणी पार पडली. यापूर्वी या क्षेपणास्त्राची चाचणी 18 जानेवारीला झाली होती. एप्रिल 2012 नंतर यामध्ये चारवेळा सुधारणा करण्यात आली.

लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस़्त्रे वाहून नेता येऊ शकतात. ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि 5 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किमी इतकी असून ते डॉ. अब्दुल कलाम बेटावरून लाँच करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते.