Breaking News

गोपीनाथ गडावर लोटला जनसागर

बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा रविवारी चौथा स्मृती दिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथे गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक ांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री राम शिंदे, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडेंसह अनेक नेते,आमदार, क ार्यकर्ते आणि नागरिकांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. ओबीसी समाजाचा एक मोठा नेता म्हणून गोपीनाथ मुंडेंची ओळख होती. मात्र 3 जूनला दिल्लीत झालेल्या एका अपघातात मुंडे यांचे निधन झाले. गोपिनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृतीदिन आहे. मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याच पांगरी परिसरात त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडेंचे कार्य आणि त्यांचा वसा जपण्यासाठी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची स्थापना केली आहे. गोपीनाथ गडावर ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावे यासाठी याठिकाणी लघु उद्योगाचे धडे दिले जातात. परिसरातील विद्यार्थ्यांच्या हातातील क ोयता कायमचा गळून पडावा यासाठी युपीएससी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.